Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – आरोग्य विभागात 5000+ पदांची मोठी भरती लवकरच

Share with your Friends

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026
Posted On: 03/04/2026Updated On: 05/04/2026

महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच आरोग्य विभागात मोठी ५ हजार पदांची महाभरती सुरु होणार आहे. या मुळे उमेदवारांना विविध पदांसाठी नोकरीच्या भरपूर संधी मिळणार आहे.

🔎 Health Department Bharti Maharashtra 2026

घटकमाहिती
भरतीचे नावMaharashtra Arogya Vibhag Bharti 2026
विभागसार्वजनिक आरोग्य विभाग
एकूण पदे5000+ (अंदाजे)
अतिरिक्त पदे2064 पदे लवकरच
पद प्रकारविविध आरोग्य विभाग पदे
अर्ज पद्धतलवकरच जाहीर होईल
भरती सुरूपुढील 1 ते 1.5 महिन्यात अपेक्षित
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र

📢 भरतीबाबत अधिकृत माहिती

‘जनतेला आरोग्यसेवा देण्यासाठी राज्यात मोठ्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. राज्यात अनेक सरकारी रुग्णालये बांधून तयार आहेत. मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने या आरोग्य सुविधा सुरू करता येत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागात पाच हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील दीड महिन्यात सुरू होईल,’ अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिली.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या मोहिमेच्या विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

🏥 भरतीमागील मुख्य कारण

या नवीन भरती मुळे आरोग्य विभागाच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.

‘महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा बांधून तयार आहेत. त्या सुरू करण्यात केवळ मनुष्यबळाचा प्रश्न आहे. पाच हजार कर्मचारी पदांच्या मान्यतेचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर पुढील आठवड्यात बैठक अपेक्षित आहे. भरतीला मंजुरी मिळाल्यानंतर महिना ते दीड महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होईल.’, असे ते म्हणाले.

-सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

arogya sevak bharti 2026

🏥 भरतीमागील मुख्य कारण

या नवीन भरती मुळे आरोग्य विभागाच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.

‘महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा बांधून तयार आहेत. त्या सुरू करण्यात केवळ मनुष्यबळाचा प्रश्न आहे. पाच हजार कर्मचारी पदांच्या मान्यतेचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर पुढील आठवड्यात बैठक अपेक्षित आहे. भरतीला मंजुरी मिळाल्यानंतर महिना ते दीड महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होईल.’, असे ते म्हणाले.

🏙️ शहरी आरोग्य आयुक्तालयाबाबत महत्त्वाची माहिती

‘शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शहरांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दिली आहे. आधी महापालिकांमध्ये ही सेवा विभागलेली होती. संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रम आणि इतर अभियाने राबविण्यात त्यामुळे अडचणी येत होत्या. शहरी आरोग्य आयुक्तालयाचे काम जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाच्या धर्तीवर चालेल. आयुक्तालय महापालिकांच्या आरोग्य सेवांवर बारकाईने देखरेख ठेवेल. याचबरोबर आरोग्य मोहिमांच्या अंमलबजावणीला गती देईल. या आयुक्तालयाची आस्थापना आणि इतर बाबींवर सध्या काम सुरू आहे,’ असेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.

-सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

📋 सरकारी योजनांबाबत अपडेट

‘महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना एकत्रितपणे राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजना जास्तीत जास्त रुग्णालयांमध्ये लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये योजना लागू करण्याचा आदेश देण्यात आला, परंतु, काही रुग्णालयांनी या बाबत न्यायालयात याचिका दाखल केली, धर्मादाय रुग्णालयांमध्ये योजना लागू व्हावी म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकरणांत संबंधित कंत्राटदार किंवा कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार आहोत,’ असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

📊 संभाव्य पदांची माहिती

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – नागरिकांना सुरळीत आरोग्यसेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असावा या दृष्टीने आरोग्य विभागाकडून ५ ते ६ हजार पदे भरण्यात येणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग खात्यांतर्गत रुग्णालये व आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील रिक्त पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत. त्यांच्या आस्थापनावर २०६४ विविध पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे समजते.

📢 महत्वाची सूचना
अशाच नवीन सरकारी नोकरी अपडेटसाठी Sarkari Mahabharti ला भेट देत रहा.
Join WhatsApp Group
Follow WhatsApp Channel
Join Telegram Channel
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

⚠️ NHM भरती व कंत्राटी कर्मचारी मुद्दा

NHM भरती तयारी सन २०२० रोजी कोरोना महामारीमध्ये काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त यांनी आरोग्य विभागातील पदे भरण्याचे मान्य केले होते. मात्र सन २०२५ च्या मध्यापर्यंत कायम कामगार, कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही.

कायम पदे भरण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असतानाही सदर पदे न भरता आस्थापना अनुसूचीवरील रिक्त पदे व २०२७ पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे याच्या ७५% पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली.

तर आरोग्य खात्याची कामे अत्यावश्यक असल्यामुळे व सदर कामकाज अविरत असल्यामुळे सदर पदे कंत्राटी पद्धतीने न भरता कायमस्वरूपी भरण्यात यावित, जेणेकरून सध्या असलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांवर होणारा अतिरिक्त ताण कमी होऊन रुग्णांनाही चांगली व सुरळीतपणे सेवा देणे शक्य होईल. कायम पदे भरेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पदे भरीत असताना एकूण आस्थापना अनुसूचीवरील रिक्त पदांचा विचार करून पदे भरण्यात यावीत, अशी विनंती युनियनने प्रशासनाला केली आहे.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 कधी सुरू होणार?

➡️ आरोग्यमंत्री यांच्या माहितीनुसार भरती प्रक्रिया पुढील 1 ते 1.5 महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.

❓ FAQs: Arogya Sevak Bharti 2026

1. Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?

➡️ सुमारे 5000 ते 6000 पदे भरण्यात येणार आहेत.

2. Government Health Jobs Maharashtra कधी सुरू होईल?

➡️ पुढील 1 ते 1.5 महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

3. Medical Jobs 2026 Maharashtra कोणकोणती पदे असतील?

➡️ विविध आरोग्य विभागातील पदे जसे की CHO, स्टाफ, इतर पदे.

4. Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 ही भरती का काढली जात आहे?

➡️ मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नवीन रुग्णालये सुरू करता येत नाहीत.

5. NHM अंतर्गत भरती होईल का?

➡️ होय, NHM संबंधित पदे देखील असण्याची शक्यता आहे.

6. Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 अर्ज प्रक्रिया कशी असेल?

➡️ अर्ज प्रक्रिया Online असण्याची शक्यता आहे.

7. 2064 पदांची माहिती काय आहे?

➡️ स्वतंत्रपणे 2064 पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.

8. कंत्राटी की कायम नोकरी?

➡️ युनियनने कायमस्वरूपी भरतीची मागणी केली आहे.

9. कोणासाठी ही संधी आहे?

➡️ महाराष्ट्रातील सर्व पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

10. ही अधिकृत माहिती आहे का?

➡️ होय, ही माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली आहे.

Table of Contents


Share with your Friends
               Sarkari Mahabharti  बद्दल माहिती....:
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon