अहमदनगर महापालिकेत 45 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2024
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024: महापालिकेत नव्याने होणाऱ्या कर्मचारी भरती प्रक्रियेमध्ये १७५ पैकी फक्त ४५ तांत्रिक पदे भरली जाणार आहेत. सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर आस्थापना खर्चामध्ये झालेली वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन, सध्या तातडीने गरज असलेल्या पदांचीच भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. दरम्यान, या भरतीत अभियंता, लिपिक-टंकलेखक, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक पदांचा समावेश असणार आहे. महापालिकेतील तांत्रिक पदांच्या सुमारे २१७ रिक्त जागांपैकी १७५ जागा सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी राज्य शासनाने मागील वर्षी मान्यता दिली होती. त्यानंतर, तत्कालीन आयुक्तांनी आवश्यक असलेल्या १३४ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती.
शासनाच्या नियुक्तीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासक्रम आणि आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे त्यांच्या पगार आणि पेन्शनचा मासिक खर्च दोन कोटी रुपयांनी वाढला आहे. यामुळे उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करून, सध्या तातडीने आवश्यक असलेल्या ४५ पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून महापालिकेला नवीन अभियंते मिळणार आहेत. विद्युत, जलपुरवठा आणि बांधकाम विभागांमध्ये तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचा निपटारा होईल. तसेच, लिपिक-टंकलेखक, संगणक प्रोग्रामर, पशुधन पर्यवेक्षक अशा विविध पदांसाठीही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यामुळे नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी कामकाज वेगवान होणार आहे.
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024WWW.SarkariMahabharti.Com |
|
---|---|
अहमदनगर महापालिकेत 45 पदांसाठी भरती |
|
भरतीसाठी मंजूर झालेली पदे | संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | १५ |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | ३ |
कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) | १ |
अभियांत्रिकी सहाय्यक | ८ |
विद्युत पर्यवेक्षक | ३ |
लिपीक टंकलेखक | १३ |
संगणक प्रोग्रॅमर | १ |
पशुधन पर्यवेक्षक | १ |
भरतीची तारीख | लवकरच कळवली जाईल |
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी सरकारी महाभरतीची अधिकृत वेबसाईट पुन्हा भेट द्या आणि आमच्या अधिकृत व्हाट्सअँप आणि टेलिग्राम चॅनलसाठी येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024
महापालिकेत १३४ जागांसाठी सरळसेवा भरतीस शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून ही प्रक्रिया थांबली आहे. तांत्रिक कर्मचारी आणि इतर विभागांमध्ये पुरेशा मनुष्यबळाच्या अभावामुळे नागरी सुविधा आणि दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत. महापालिकेच्या आकृतिबंधात २,७८० पदे मंजूर आहेत, पण अनेक वर्षांत बरेचसे कर्मचारी आणि अधिकारी निवृत्त झाले आहेत. सध्या फक्त १,५०० कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यामुळे मंजूर पदांच्या तुलनेत अर्ध्याच कर्मचाऱ्यांवर महापालिकेचे काम सुरू आहे.
Related Posts
१३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिल्यानंतर, भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी टीसीएस कंपनीशी करार करण्यात आला आहे. महापालिकेने आवश्यक ती सर्व माहिती कंपनीला दिली आहे, परंतु परीक्षेचे अंतिम वेळापत्रक तयार होत नसल्याने प्रक्रिया पुढे सरकत नाही. या भरतीसंबंधीची सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी सरकारी महाभरतीचे अधिकृत वेबसाईट वर पुन्हा भेट द्या.
[lwptoc title=”Table Of Contents”]