Maharashtra Police Bharti Syllabus 2025 | Download PDF

Share with your Friends

 Maharashtra Police Bharti 2025 Syllabus Download PDF

Maharashtra Police Bharti 2022 Syllabus PDF Download

महाराष्ट्र पोलीस भरती 2025: अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप आणि महत्वाची माहिती

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल. Police Bharti Syllabus, Admit Cards, आणि Answer Key यासंबंधी संपूर्ण माहिती खाली सविस्तर दिली आहे.


महाराष्ट्र पोलीस भरती 2025: निवड प्रक्रिया

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांमध्ये पार पडते:

1. लेखी परीक्षा

2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)


लेखी परीक्षेचे स्वरूप

विषय एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 25 90 मिनिटे
बौद्धिक चाचणी 25 25
मराठी व्याकरण 25 25
सामान्य ज्ञान / चालू घडामोडी 25 25
एकूण गुण 100 100

टीप: गडचिरोली जिल्ह्यासाठी पेपर 2 देखील असणार आहे.


पेपर 2 (गडचिरोली जिल्ह्यासाठी)

विषय एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गोंडी भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान 25 25  

 

90 मिनिटे

वाक्यरचना/भाषांतर (गोंडी-मराठी) 25 25
गोंडी माडिया भाषेच्या ज्ञान 25 25
वाक्यरचना/भाषांतर (माडिया-मराठी) 25 25

Maharashtra Police Bharti 2025: अभ्यासक्रम (Syllabus)

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम – विषयवार तपशील

विषय महत्वाचे घटक
गणित संख्या ज्ञान, संख्याचे प्रकार, मसावी-लसावी, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, सरासरी, शेकडेवारी, भौमितिक संकल्पना
बौद्धिक क्षमता क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी/भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंध ओळख, निरीक्षण
मराठी व्याकरण वाक्य रचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर सामान्य माहिती

टीप: वरील घटकांचा अभ्यास हा परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्य नियोजन आणि सरावाद्वारे यशस्वी होण्याची शक्यता वाढेल.


शारीरिक चाचणी (Physical Test)

पुरुष उमेदवारांसाठी

चाचणी प्रकार गुण
1600 मीटर धावणे 30
100 मीटर धावणे 10
गोळा फेक 10
एकूण गुण 50

महिला उमेदवारांसाठी

चाचणी प्रकार गुण
800 मीटर धावणे 30
100 मीटर धावणे 10
गोळा फेक (4 किलो) 10
एकूण गुण 50

Police Bharti भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

क्रमांक कागदपत्राचे नाव
1 शाळा सोडल्याचा दाखला/10वी गुणपत्रक
2 12वी चा गुणपत्रक
3 अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र
4 जात प्रमाणपत्र (प्रवर्गानुसार)
5 आधार कार्ड (ऐच्छिक)
6 प्रवेशपत्र (Hall Ticket)
7 पासपोर्ट साईज फोटो (5 प्रती)

महत्वाचे मुद्दे

  • परीक्षेसाठी नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही.
  • परीक्षा फक्त मराठी भाषेत असणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे.

Admit Cards आणि Answer Key

लेखी परीक्षेसाठी Police Bharti Admit Cards आणि उत्तरतालिका (Answer Key) अधिकृत संकेतस्थळावर (mahapolice.gov.in) वेळेत उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी आणि Police Bharti Syllabus PDF डाउनलोडसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

एनसीसी प्रमाणपत्र नवीन जीआर:
महाराष्ट्र गृह विभागाने पोलीस शिपाई भरतीसंदर्भात नवीन शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे. राष्ट्रीय छात्र सेना (NCC) “C” प्रमाणपत्र धारक उमेदवारांना 5 अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

NCC Certificate New GR – New GR Regarding Police Shipai Bharti

Maharashtra Police Bharti Syllabus PDF डाउनलोडसाठी मार्गदर्शन

Maharashtra Police Bharti Syllabus साठीचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात उपलब्ध आहे. उमेदवार हा अभ्यासक्रम PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात व प्रिंट घेऊन अभ्यासासाठी वापरू शकतात.


[lwptoc]


Share with your Friends

No tags found for this post.

Sarkari Mahabharti  के बारे में
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

---Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon