माझी लाडकी बहीण योजना 2025 महाराष्ट्र – संपूर्ण माहिती आणि eKYC कसे करावे

Share with your Friends

Ladki Bahin Yojana 2025
माझी लाडकी बहीण योजना 2025

🔹 माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र – काय आहे?

Ladki Bahin Yojana २०२५ ही राज्य शासनाची महिलांसाठी सुरू केलेली आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 इतकी मदत थेट त्यांच्या आधार-लिंकड बँक खात्यात पाठवली जाते.

ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे त्या आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.

Ladki Bahin Yojana योजनेची पात्रता:

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची स्थायी निवासी असावी.
  • वय 21 ते 65 वर्षे असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे.
  • आधार आणि बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे.

🔹 सरकारने eKYC का अनिवार्य केले आहे?

सरकारने अलीकडेच eKYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे कारण अनेक अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. eKYC केल्याने फक्त पात्र महिलांनाच आर्थिक मदत मिळेल.

जर लाभार्थींनी वेळेत eKYC पूर्ण केले नाही, तर त्यांच्या खात्यातील मदत थांबवली जाऊ शकते.


🔹 eKYC म्हणजे काय?

eKYC (Electronic Know Your Customer) म्हणजे आधार आणि मोबाईलद्वारे तुमची ओळख पडताळून घेण्याची डिजिटल प्रक्रिया.
ही प्रक्रिया UIDAI, बँका, किंवा अधिकृत सरकारी पोर्टल द्वारे केली जाते.

eKYC प्रक्रियेमुळे अर्जदाराचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, आणि मोबाईल नंबर यांची पडताळणी होते.


🔹 माझी लाडकी बहीण योजनेमध्ये eKYC कसे करावे? (Step-by-Step Guide)

अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या संकेतस्थळावर जा.

📢 महत्त्वाची सूचना:

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया अधिकृत जाहिरात नीट वाचा. ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळविण्यात मदत करा.
दररोजच्या सरकारी नोकऱ्यांचे मोफत अपडेट्स मराठीमध्ये मिळवण्यासाठी भेट द्या 👉 SarkariMahabharti.com

eKYC पर्याय निवडा:
मुखपृष्ठावर “eKYC” किंवा “लाभार्थी eKYC” लिंकवर क्लिक करा.

✅ Step 1: आधार क्रमांक प्रविष्ट करा

  • लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाका.
  • CAPTCHA कोड टाकून .
  • “मी सहमत आहे” (I Agree) या चेक बॉक्सवर टच करा. आणि Send OTP बटनावर क्लिक करा.

✅ Step 2: OTP व्हेरिफाय करा

तुमच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP (One Time Password) येईल. हा 6 किंवा 10 अंकी ओटीपी टाका आणि ‘Verify’ (स्थापित करा) वर क्लिक करा.

✅ Step 3: पती/वडिलांचा आधार क्रमांक प्रविष्ट करा

  • जर महिला विवाहित असाल – पतीचा आधार क्रमांक टाका.
  • जर महिला अविवाहित असाल – वडिलांचाआधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर दाखवलेला Captcha Code अगदी बरोबर भरा.
  • “मी सहमत आहे” (I Agree) या चेकबॉक्सवर टच करा आणि ‘Send OTP’ बटनावर क्लिक करा.

✅ Step 4: OTP व्हेरिफाय करा

पती/वडिलांचा आधार कार्डाशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP (One Time Password) येईल. हा 6 किंवा 10 अंकी ओटीपी टाका आणि ‘Verify’ (स्थापित करा) वर क्लिक करा.

✅ Step 5: जातीचा प्रवर्ग

  • पुढील टप्प्यात तुमच्या जातीचा प्रवर्ग (Caste Category) निवडा.
  • यानंतर काही प्रश्न विचारले जातील:
  • “तुमच्या कुटुंबात एखादी लाभार्थी नोकरीला नाही का?” → होय निवडा.
  • “तुमच्या कुटुंबात फक्त एक किंवा दोनच महिला लाभ घेत आहेत का?” → होय निवडा.
  • शेवटी दिलेल्या Declaration Checkbox वर क्लिक करून सहमती द्या.
  • ‘स्थापित करा’ (Verify) या बटनावर टच करा.

✅ Step 6: eKYC पूर्ण!

वरील सर्व प्रक्रिया नीट पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर “Your eKYC has been successfully completed” असा संदेश दिसेल.

याचा अर्थ तुमची eKYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या संकेतस्थळावर जा.

वार्षिक पुनर्पडताळणी:

दरवर्षी eKYC अद्यतन करणे आवश्यक आहे, अन्यथा योजना लाभ थांबू शकतो.


🔹 का आवश्यक आहे eKYC?

  • फसवणूक आणि अपात्र लाभार्थ्यांपासून संरक्षण
  • निधी थेट पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे
  • पारदर्शक आणि सुरक्षित प्रणाली सुनिश्चित करणे

सरकारने सांगितले आहे की, 26 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी ओळखले गेले आहेत आणि त्यांच्यासाठी eKYC न केल्यास मदत थांबवली जाईल.


🔹 महत्वाच्या सूचना (Tips & Warnings)

  • फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच eKYC करा.
  • कोणत्याही व्यक्तीला तुमचा OTP शेअर करू नका.
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • eKYC करताना इंटरनेट कनेक्शन स्थिर ठेवा.


Share with your Friends

No tags found for this post.

Sarkari Mahabharti  के बारे में
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

---Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon